जामखेड प्रतिनिधी
युवकांनी तसेच समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत सर्व शासकीय योजना पोहचणे गरजेचे आहे.समाजात उद्योजक तयार होणे गरजेचे आहे. समाजातील सर्व घटकांना उद्योजक होण्यासाठी मदत करणार सध्या तरुण उद्योजक तयार होणे गरजेचे आहे.
सिद्धार्थ नगर येथे प्राचार्य विकी घायतडक यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे खादी ग्रामोद्योग विभागाचे प्रमुख डायरेक्टर मनीष कांबळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार रोहीत दादा पवार यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्याचे खादी ग्रामोद्योग विभागाचे प्रमुख डायरेक्टर मा मनीष कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून जामखेड मधील अनेक बचत गट व महिलांना आगरबती मशीनचे व कर्ज वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रम संपल्यावर महाराष्ट्र राज्याचे खादी ग्रामोद्योग विभागाचे प्रमुख डायरेक्टर मा मनीष कांबळे यांनी सिद्धार्थ नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून युवकांशी संवाद साधला. यावेळी मा मनीष कांबळे म्हणाले युवकांनी तसेच समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत सर्व शासकीय योजना पोहचणे गरजेचे आहे.समाजात उद्योजक तयार होणे गरजेचे आहे.समाजातील सर्व घटकांना उद्योजक होण्यासाठी मदत करणार.शासनाच्या 350 हून अधिक योजना उपलब्ध आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा.यावेळी प्रा.विकी घायतडक यांनी प्रास्ताविक मांडले तसेच शाल व श्रीफळ देऊन सिद्धार्थ नगर मित्र मंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी हरिभाऊ घायतडक गौरव सदाफुले,कबीर घायतडक,योगेश बाळा सदाफुले, पप्पुराज सदाफुले,शुभम घायतडक,रोशन सदाफुले, चंदू जगताप,फोटोग्राफर झगडे,सावता म्हेत्रे,प्रितम घायतडक,सुमित घायतडक,रोहन सदाफुले इ मान्यवर उपस्थित होते.






