जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड गाळा क्रमांक २ येथे मॉन्जिनीज केक ब्रैण्ड शाखा के. के. फुडस् या दुकानाचे उद्घाटन शुभारंभ बारामती अँग्रो च्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांच्या शुभ हस्ते फित कापून तसेच हभप कैलास (महाराज) भोरे यांच्या हस्ते नारळ फोडून सकाळी ११.०० वा. झाले.
यावेळी खैरे बोलताना म्हणाले, सध्या फ्रेश क्रीम केक चा ट्रेंडिंग आहे. आणि त्यात असंख्य फ्लेवर्स, डिझाईन उपलब्ध आहेत. चॉकलेट केकला लोकांची सर्वात जास्त पसंती असते आणि त्या खालोखाल स्ट्रॉबेरी, कॅरॅमल इत्यादी फ्लेवर्स. मात्र, केक आजच्या स्वरूपात यायच्या शतक आधी मात्र खूपच निराळ्या स्वरूपात होता.
याप्रसंगी जिल्हा बॅकेचे संचालक अमोल राळेभात,सरपंच बाळासाहेब खैरे, फुडस् चे संचालक किरण खैरे, अभिमन्यु पवार, कृ. उ. बा. स.संचालक संजय वराट, प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात,
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे ता. अध्यक्ष मंगेश आजबे, अभिजित राळेभात,नगरसेवक पवनराजे राळेभात,गणेश खैरे,प्रवीण खैरे,अमोल फदांडे ,सतीश पंढरीनाथ शिंदे,विजय पवार,कानिफनाथ वायकर, उमेश माळवदकर,ओंकार पवार आदी उपास्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here