जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल विंचरणा नदीच्या तिरावर आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बसविण्यात आलेल्या भगवान शंकराची महाशिवरात्री निमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
महाशिवरात्री निमित्त भगवान शंकराची मुर्ती व परिसरा मध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून यावेळी संपूर्ण परिसर उजळून गेला. तसेच सायंकाळी ७ वा. महाआरती लोहकरे दांमपत्याच्या हस्ते भगवान शंकराची महाआरती हलगी , संभळ च्या गजरात करण्यात आली. श्री स्वामी समर्थ येथिल माहिला मंडळाने भगवान शंकराची आरती गायली. यामुळे संपूर्ण परिसर ओंकाराच्या स्वरांनी भारावून गेला.
या कार्यक्रमासाठी महाप्रसादाचे नियोजन उद्योजक रमेश आजबे यांनी केले. तसेच लाईट ची व्यवस्था साठी प्रविण उगले यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमा प्रसंगी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात, जि. सरचिरणीस राजेंद्र पवार , शिवसेने चे ता. प्रमुख संजय काशिद, उद्योजक रमेश आजबे, विजयशेठ कोठारी,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, प्रथम नगरध्यक्ष विकास राळेभात,उपनगराध्यक्ष महेश निमोणकर,प्रा.लक्ष्मण ढेपे,युवा नेते प्रविण उगले, शहर उपाध्यक्ष प्रा. राहुल आहिरे नगरसेवक मोहन पवार, अँड. हर्षल डोके, नगरसेवक अमित जाधव, महेंद्र राळेभात,चौंडी सरपंच सुनील उबाळे, बोर्ले सरपंच काकडे, संदेश कोठारी, हरिभाऊ आजबे, डॉ. नरसाळे, अमोल लोहकरे,दादा महाडिक,घनश्याम अडाले,काकासाहेब कोल्हे , दादा महडिक आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० पासून सायंकाळी ७ पर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाआरती संपूर्ण नियोजन मा. श्री अमोल लोहकरे व श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांनी केले.






