जामखेड प्रतिनिधी

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे हे मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून जामखेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देखील तहसील कार्यालय जामखेड येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण सुरू केले होते . या आंदोलनास तालुक्यातील विविध संघटना व पक्षांनी पाठींबा दिला आहे. सायंकाळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले व उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी सकल मराठा समन्वयक मंगेश (दादा) आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस चे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, प्रदिप टापरे, पांडुराजे भोसले, प्रविण बोलभट, राहुल पवार, जयसिंग उगले, कीशोर गायवळ, दादाराजे भोसले, अनिल सरोदे, सुरत कदम, तुषार काढणे, कृष्णा डुचे, बंडु मुळे, प्रशांत शिंदे, संजय ढोले, ऋषि भोसले, ऋषिकेश डुचे, गणेश चव्हाण सह सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवसभर विविध पक्षांच्या नेत्यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दर्शविला यावेळी बोलताना सकल मराठा समाजाचे समन्वयक मंगेश (दादा) आजबे म्हणाले की समाजातील बहुतांश समाज हा गरीब आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आरक्षण जाहीर न केल्यास परत मराठा समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत असा इशारा दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.सायंकाळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले व उपोषण मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here