जामखेड प्रतिनिधी

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. याच निषेधार्थ आज जामखेड येथे तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने केशारी यांच्या फोटोला जोडे मारुन आंदोलन केले. यानंतर त्यांचा फोटो जाळून सकल मराठा व शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला.

यावेळी सकल मराठा समन्वयक मंगेश (दादा) आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस चे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, राहुल पवार, जयसिंग उगले, कीशोर गायवळ, दादाराजे भोसले, अनिल सरोदे, सुरत कदम, तुषार काढणे, कृष्णा डुचे, बंडु मुळे, प्रशांत शिंदे, संजय ढोले, ऋषि भोसले, ऋषिकेश डुचे, गणेश चव्हाण सह सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल दि २७ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांन बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींन मध्ये नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याच अनुषंगाने आज दि २८ रोजी जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने व शिवप्रेमींच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारुन घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. यानंतर त्यांचा फोटो जाळून त्यांनी आपले बेताल वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठाच्या वतीने देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here