जामखेड प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने खुल्या गटातील भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे असे सांस्कृतीक विभागाचे जामखेड तालुकाध्यक्ष श्री दिपक तुपेरे यांनी सांगितले.
या स्पर्धा 15 वर्षापुढील खुल्या गटातील सर्व स्पर्धकांसाठी असून शिवजयंती दिवशी दि.19 फेब्रुवारी 2022 ला सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री नागेश कन्या विद्यालय जामखेड या ठिकाणी घेण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून रांगोळी व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतःचे आणायचे आहे व स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
शिवजयंती निमित्त आयोजित या स्पर्धेत 1) छत्रपती शिवराय(पोट्रेट) 2) शिवराज्याभिषेक सोहळा 3) छत्रपती शिवराय आणि राजमाता माँ जिजाऊ 4) सामाजिक संदेश देणारी रांगोळी यांपैकी कोणत्याही एका विषयावर रांगोळी काढावी लागणार असून स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त रांगोळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.श्री. राजेंद्रजी कोठारी यांचे रु.5000/-,द्वितीय क्रमांक प्राप्त रांगोळीस राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा अध्यक्ष मा. मधुकर(आबा)राळेभात यांचे रु.3000/- व तृतीय क्रमांक प्राप्त रांगोळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामखेड शहराध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी गोरे यांचे रु.2000/- अशी पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी
1) 9423167350
2) 9975180446
3) 9552755205 या नंबरवर नावनोंदणी करावी असे आवाहन स्पर्धेचे आयोजक जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष मा.श्री दिपक तुपेरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here