जामखेड प्रतिनिधी

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून नुकतेच शंभुसुर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था जामखेड च्या वतीने तालुक्यातील संस्थेच्या १०० विद्यार्थ्यानी २४००० सूर्यनमस्कार घालून विक्रम केला.

शालेय विद्यार्थी, युवक व नागरीकांन मध्ये योग विषयक आवड निर्माण व्हावी या उद्देशाने योगाचा प्रसार करण्याकरीता सुर्य नमस्कार दिनाचे औचित्य साधून व कोरोना नियम पाळुन गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या आदेशाने, व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बबलू वस्ताद टेकाळे यांच्या मार्गदर्शनाने जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या जामखेड, मातकुळी , पिंपरी , जवळका , आणि जवळा या पाच संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त सूर्यनमस्कार मारण्याचा संकल्प करण्यात आला होता. तो संकल्प नुकताच जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या १०० विद्यार्थ्यानी २४००० सूर्यनमस्कार घालून पूर्णत्वास नेला.

प्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हाप्रमुख अरूण (बापु) ठाणगे,संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजु भांबे, सचिव अमोल निमोणकर,निलेश गोड, सागर डोके, प्रविणराव जरे, रविराज क्षिरसागर, रोनित खुपसे, सिद्धू वाळुंजकर ,मिनानाथ मते सर, परशुराम डांगरे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here