कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये मिरजगाव येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या कल्याणीताई शंकरराव नेवसे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी शंकर नेवसे, उद्धव नेवसे, राजेंद्र गोरे, समन्वयक प्रसाद पाटील, सोपान बनकर, दिलीप कोल्हे, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका प्राध्यापक इतर कर्मचारी, व सर्व विद्यार्थी ऑनलाईन ,व ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी केले तर सौ कल्याणी ताई नेवसे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल बहुमोल मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषी महाविद्यालयातील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वेगवेगळ्या दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रियायुक्त पदार्थ, काढणीपश्चात मूल्यांकित पदार्थ तयार करून त्याचे विक्री उद्घाटन आलेल्या सर्व मान्यवरांच्या व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका पूजा इनामके यांनी केले. कर्जत येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय या ठिकाणी झाला प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस विभागाने त्यांना मानवंदना दिली.






