जामखेड प्रतिनिधी

बीड येथिल खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे जामखेड शहरातील मिलिंदनगर येथे आले आहेत. अशी खात्रीशीर माहिती जामखेड पोलीसांना मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता दोन अरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, हॉटेलमधील बील देण्याच्या कारणावरून बीड येथे खुन करणाऱ्या गुन्ह्यातील संशयित आरोपी जामखेड शहरातील मिलिंदनगर येथे आले आहेत. यानुसार तात्काळ गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी पाठवुन खात्री केली असता, सदर ठिकाणी आदेश भगवान जोगदंड (वय २० वर्षे) रा.जायकवाडी काँलनी, नगर रोड, बीड , व प्रथमेश तुकाराम घुले (वय २२ वर्षे) ,रा. अंकुश नगर, नगर रोड, बीड ,असे दोन संशयीत इसम मिळून आले. त्यांना जामखेड पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांच्याकडे कसून सखोल विचारपूस केली असता त्यांनी किशोर नंदलाल गुरखूदे रा.जव्हेरी गल्ली, बीड यास लोखंडी रॉडने मारहान केल्याचे सांगितले त्यानंतर तो उपचार घेत असताना मयत झाला होता. आम्हीच सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयाबाबत खात्री केली असता शिवाजी नगर,बीड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्यास ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाथरकर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब चव्हाण साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदिप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरूण पवार, संदिप आजबे,सचिन देवढे यांनी केली आहे. जामखेड पोलिसांकडून अश्या कारवाया होत राहील्या तर गुन्हेगांराचे आश्रयस्थान ही जामखेडची ओळख लवकर पुसली जाईल असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here