जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या ११ विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे. त्यामुळे शाळेचे शिक्षकांचे व विद्यार्थीचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नवीन मराठी ( लोकमान्य) शाळेचे इयत्ता ५ वी मधिल गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थ्यांन मध्ये अनुष्का मोळवणे, इंद्रजीत दळवी, पंकज खंडागळे, ऋषिकेश पवार, संध्या गाडे तेजस गुगळे, तर इयत्ता ८ वी गुणवत्ता यादी मध्ये रिया राठोड, अविष्कार दळवी, गार्गी राळेभात, अथर्व परदेशी, अनघा कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी यश मिळाले आहे.
इयत्ता ५ वी या वर्गास मार्गदर्शन करणाऱ्या देशमुख मॅडम, महाजन मॅडम, वाघ मॅडम, तसेच इयत्ता ८ वी या वर्गास मार्गदर्शन करणारे हजारे सर, पवार मॅडम व बांगर सर तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात एम.के.व संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र देशपांडे ,कोषाध्यक्ष श्री. उमेश देशमुख अभिनंदन केले.






