राजेंद्र जैन/ कडा
————–
तालुक्यातील टाकळसिंगसह विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय अधिका-यांसह गटशिक्षण अधिका-यांच्या उपस्थितीत तालुक्यातील धामणगाव, कडा, खुंटेफळ, सुलेमान देवळा व टाकळसिंग, शाळांमधील पंधरा ते अठरा वयोगटातील जवळपास १३७५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डाॅ जयश्री शिंदे व गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव यांनी दिली.
राज्यात कोरोना ओमायक्राॅनचा वाढता प्रादुर्भाव तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने पंधरा ते अठरा या वयोगटातील शालेय मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेचा भाग म्हणून आष्टी तालुक्यातील धामणगाव, कडा, खुंटेफळ, सुलेमान देवळा व टाकळसिंग, शाळांमधील पंधरा ते अठरा वयोगटातील जवळपास १३७५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ जयश्री शिंदे, गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव, वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितिन मोरे, डाॅ प्रियांका सिंघण, डाॅ कृष्णा वाघ, डाॅ दीपक शेळके, डाॅ पैठणे, डाॅ आरबे, डाॅ राऊत तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांच्या उपस्थितीत विविध शाळांमधील पंधरा ते अठरा वयोगटातील १३७५ विद्यार्थी, विद्यार्थ्यींनींना पहिल्याच दिवशी कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. यामध्ये तालुक्यातील धामणगाव -१६५, कडा- ४२४, खुंटेफळ-२४९, सुलेमान देवळा-२३२ व टाकळसिंग- ३०५, असे एकूण १३७५ विद्यार्थ्यांनी या लसीकरण मोहीमेत विविध ठिकाणी सहभाग नोंदवला आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालकांनी विद्यार्थ्यांना लसीकरण करुन घेण्याबाबत प्रोत्साहित करावे. तसेच लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करण्याचे आवाहन आष्टीच्या आरोग्य व शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
——-%%%——-
कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारकडून पंधरा ते अठरा वयोगटातील शालेय मुलांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात असून यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. शिक्षक, पालकांनी मुलांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
– डाॅ. नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी
——–%%%——
कोरोना, ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हा धोका लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेण्यासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालकांनी देखील ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे.
-सुधाकर यादव, गटशिक्षण अधिकारी, आष्टी
——-%%%——






