जामखेड प्रतिनिधी
हॉस्पिटल च्या कर्मचार्याने एक्सरे काढण्यासाठी पैसै आधी भरा म्हणाल्याचा राग आल्याने पन्हाळकर हॉस्पिटल मधिल कर्मचाऱ्यास दोघांनी लोखंडी रॉड व प्लंबीग च्या पाईप ने जबर मारहाण केली. या घटनेत कर्मचारी जखमी झाला असून पेशंट सोबत आलेल्या दोन हल्लेखोरान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णाचे नातेवाईक आसलेले आरोपी हल्लेखोर दिपक चव्हाण व आनंद बाळासाहेब मोरे दोघे रा. जामखेड यांनी रुग्ण महेश ऊर्फ भैय्या परदेशी याचा अपघात झाला आसल्याने त्यांनी बीड रोडवरील पन्हाळकर हॉस्पिटल या ठिकाणी त्यास उपचारासाठी आणले होते. त्यावेळी फिर्यादी कर्मचारी विनोद डोके याने आधी एक्सरे चे पैसै भरा व जखमीच्या डोळ्याला मार लागल्यामुळे रुग्णला डोळ्याच्या दवाखाण्यामध्ये घेवुन जा असे सांगितले. त्यामुळे आरोपींना राग आल्याने, त्यांनी फिर्यादी व डॉक्टर यांना शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्याने मारहान केली, त्यानंतर आरोपींनी हाँस्पिटलच्या बाहेर जावुन पाण्याच्या बोअरचे नुकसान करून पाईप तोडुन, प्लंबीगचा पाईप व दगडाने मारहाण केली.
त्यानंतर पुन्हा त्याच दिवशी रात्री पावणेआठ वा च्या सुमारास आरोपी दिपक चव्हाण याने त्याची चारचाकी वाहन क्रमांक MH-08-AC-9394 मधुन लोखंडी राँड घेवुन हाँस्पिटलमध्ये शिवीगाळ करत आला व फिर्यादीस जिवे मारण्याचे उद्देशाने डोक्यावर लोखंडी राँड मारला तो फिर्यादीने हुकविला व त्यामुळे जिव वाचला व तेथुन पळुन जावुन हाँस्पिटलचे रूम मध्ये लपुन बसला. त्यानंतर तेथे डाँक्टर व हाँस्पिटलाचा स्टाफ आल्याने वरील आरोपी तेथुन पळुन गेला. या प्रकरणी वरील दोन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






