कडा / वार्ताहर
तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी मधुकर कर्डीले यांची तर उपाध्यक्षपदी गोकूळ बोराडे, शेख आसिफ शेख बशीर, अनिल टपास यांची, सहसचिव म्हणून संजय काकडे आदींची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
आष्टी तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सचिव काॅ. सुरेश निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कडा येथील महेश मंदिरात ग्रामपंचायत कर्मचा-यांची शनिवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत खालीलप्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. आष्टी तालुकाध्यक्षपदी मधुकर कर्डीले, उपाध्यक्ष म्हणून गोकूळ बोराडे, शेख आसिफ शेख बशीर, अनिल टपास, सहसचिव संजय काकडे, सल्लागार दत्तू देसाई, कोषाध्यक्ष दीपक खरात, सह कोषाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सहायक नागनाथ गोयकर तर संघटनेचे सदस्य म्हणून खुशाल काळूके, ताज महमंद, दादा जगधने, बाबु आंधळे, शेख फकीर शेख सजन तर सर्जेराव करांडे, दीपक मोरे यांना स्वीकॄत सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
आष्टीच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांच्या निवडबद्दल आ. सुरेश धस, आ.बाळासाहेब आजबे, माजी सभापती रमझान तांबोळी, संजय ढोबळे, जयदत्त धस, उपसरपंच संपत कर्डीले, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, बंटी गायकवाड, प्रशांत देशमुख, भाऊसाहेब भोजने, सुनील देशमुख, अनिल शिंदे, संतोष भोरे, बलभीम परकाळे, दिलिप घायाळ, नागेश कर्डीले, सय्यद अन्सार, विठ्ठल भालेराव, संतोष जगताप, राजू तावरे, आप्पा सांगळे, अनिल अष्टेकर परमेश्वर कर्डीले, प्रा भगवान वाघुले, प्रा सुभाष गांगर्डे, प्रताप परदेशी, प्रविण बहीर, ईश्वर गांधी, सय्यद शाकीर किशोर कर्डीलेंसह तालुका पत्रकार संघ, सर्व ग्रा प कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.
——%%%%——






