कडा / वार्ताहर
नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी हायस्पीड रेल्वे चाचणी 29 व 30 डिसेंम्बर रोजी घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने कळवले आहे.
नगर- बीड-परळी रेल्वे मार्गावतील नगर, आष्टी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून 29 व 30 डिसेंम्बर या दिवशी या 61 किमी मार्गावर हायस्पीड रेल्वे चाचणी सोलापूरवाडी ते आष्टी दरम्यान होणार आहे. या मार्गवार पिंपळा , खुंटेफळ, कुंभेफळ , चिंचोली, धानोरा , साबलखेड, कडा, शेरी बुद्रुक, जळगाव, राघापूर येथील लोकांनी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत येऊ नये. असे आवाहन करण्याचे पत्र आष्टी तहसीलदारांना मध्य रेल्वेने दिले आहे . दरम्यान
राज्य शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 1322.87 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रकल्पाच्या high speed rail खर्चात हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन 2021-22 करिता रेल्वेने केलेल्या मागणीच्या रक्कमे पैकी 90.13 कोटी निधी राज्य सरकारने मंजूर करून वितरित करण्यास परवानगी दिली आहे. याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत






