कर्जत प्रतिनिधी

कर्जत नगरपंचायत मधील उर्वरित चार प्रभागांचे आरक्षण आज गुरुवारी काढण्यात आले यामध्ये काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक सचिन घुले यांचा प्रभाग महिला राखीव निघाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इतर मागास प्रभागातील निवडणुका थांबवण्यात आल्या होत्या व या निवडणुका सर्वसाधारण जागेसाठी घेण्यास संमती न्यायालयाने व निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आज जागांचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये प्रभाग एक गायकरवाडी व प्रभाग पाच पोस्ट ऑफिस परिसर हे दोन प्रभाग महिलांसाठी आरक्षित निघाले असून उर्वरित प्रभाग तीन समुद्र मळा व प्रभाग 7 बुवासाहेब नगर हे सर्वसाधारण आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिली.

या चार जागांसाठी २९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असुन दि ४ जानेवारी रोजी छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १० जानेवारी रोजी होणार आहे. या चारही प्रभागाचे मतदान दि १८ जानेवारी रोजी होणार आहे. या मधिल एक जागा बिनविरोध झाली आसल्याने उर्वरित संपूर्ण १६ प्रभागाचे मतमोजणी ही दि १९ जानेवारी रोजी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here