Home ताज्या बातम्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडुन दिशा अंकाचे कैतुक

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कडुन दिशा अंकाचे कैतुक

जामखेड प्रतिनिधी

राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिशा या अंकाचे व संपादक अविनाश बोधले यांचे विशेष कौतुक केले. यावेळी आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके कर्जत पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र गुंड उद्योजक दीपक शिंदे दादासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिशा या साप्ताहिकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या दोन वर्षाच्या कर्जत जामखेड मतदार संघातील वाटचालीवर विशेषांक प्रसिद्ध केला. हा अंक राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत येथे नगरपंचायत चा प्रचार सभेमध्ये आले असता या अंकाचे आवर्जून याचे वाचन केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेला पाठपुरावा आणि त्याबद्दल संपादक अविनाश बोधले यांनी संपादकीय व इतर लेखांमध्ये केलेले उल्लेख उत्कृष्ट फोटोग्राफी आणि उत्कृष्ट संपादन केल्याबद्दल अविनाश बोधले यांचे विशेष कौतुक केले व अशा पद्धतीची सकारात्मक पत्रकारिता जर सर्वत्र निर्माण व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केले एवढेच नव्हे तर पुढील काळामध्ये जामखेड येथे आल्यावर विषयाची संपादक अविनाश बोधले यांचा मी स्वतः विशेष सन्मान करणार आहे असा आवर्जून उल्लेख केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी देखील दिशा या विशेषांकाचे कौतुक करताना मतदारसंघांमध्ये करत असलेल्या कामाची दखल घेतल्याबद्दल संपादक अविनाश बोधले यांना विशेष धन्यवाद दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यावेळी बोलताना म्हणाले की हा अंक नसून खऱ्या अर्थाने आमदार रोहित पवार यांनी केलेल्या कामाचा आरसा आहे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व इतर सर्व नागरिकांनी घरांमध्ये संग्राह्य करून ठेवावा असा हा विशेषांक आहे आणि असा विशेषांक काढल्याबद्दल संपादक अविनाश बोधले व त्यांच्या सर्व टीमला मी विशेष धन्यवाद दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!