जामखेड प्रतिनिधी
राज्यस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यात चोरी व फसवणुकीचे २६ गुन्हे करणारा सराईत अट्टल गुन्हेगार जामखेड पोलीसांच्या मदतीने अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे याबद्दल जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
मा. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन यांना मध्यप्रदेश राज्यातील नरवर पोलीस स्टेशन जि. शिवपुरी राज्य मध्यप्रदेश येथील पोलीस नामे पोउपनि मनिष सिंह जादौन यांनी संपर्क करून कळविले की, राज्यस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील वेगवेगळया ठिकाणी चोरी करणारा व फसवणुक करणारा आरोपी नामे फरमान अली उर्फ फिरोज उर्फ समिरुद्दीन उर्फ उडा नजीर अली हा अनेक गुन्हयात वरील राज्यातील पोलीसांना पाहिजे आहे परंतु तो मिळुन येत नाही व त्याने काही दिवसापुर्वीच नरवर पोलीस स्टेशन हद्दीत सोने चोरी करून तो महाराष्ट्रात प्रवेश केलेला असुन जामखेड येथे
आलेला असल्याची शक्यता आहे. याबाबत सदर चोराचे फोटो देखील पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन यांना पाठविले होते. मिळालेल्या माहितीवर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळे पथक तयार करून व गोपनीय खबऱ्या मार्फत सदर आरोपीचा शोध घेतला आसता सदर आरोपी दि. १६ डिसेंबर हा जामखेड शहरातील एका ठिकाणी राहत असल्याचे समजल्याने त्यांनी त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळेस त्याचे ताब्यात एक ईको स्पोर्ट गाडी मिळुन आली आहे. त्याच वेळी मध्यप्रदेश राज्यातील नरवर पोलीस स्टेशन जि. शिवपुरी राज्य मध्येप्रदेश येथील पोलीस नामे पोउपनि मनिष सिंग जादौन हे देखील त्यांचे टिमसह जामखेड येथे दाखल झाल्याने त्यास त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई हि मा. पोलीस अधिक्षक श्री. मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड, डिबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पो.ना. अविनाश ढेरे, पो.कॉ. संग्राम जाधव, संदिप राउत, अरुण पवार, आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी, संदिप आजबे यांचे टिमने केली आहे.






