जामखेड प्रतिनिधी

जामखेड पासुन जवळच आसलेल्या भुतवडा गावी घरातील लोक शेताता गेले असताना याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरटय़ाने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून 64 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की दि ७ डिसेंबर रोजी सकाळी फीर्यादी केशव विजय डोके वय. ३२ रा. भुतवडा ता. जामखेड हे आपल्या घराला कुलूप लावून सर्वजण शेतात काम करण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरटय़ाने भरदुपारी दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. व घरातील ४० हजार रुपये रोख व २४ हजार रुपयांचे दागिने असा एकुण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

सदरची घटना शेतातु आल्यानंतर पाहीली आसता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली. या नंतर अहमदनगर येथुन श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भुतवडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ संजय लाटे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here