जामखेड प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्ण रोखण्यासाठी किंवा येणाऱ्या कोणत्याही लाटेस रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशानुसार शहरातील व्यवसायकांनी संपुर्ण लसीकरण करण्यास हलगर्जीपणा करु नये. सदर ची बाब मुख्याधिकारी व नगर परिषद पथकाच्या लक्षात आल्यास त्यांच्या कडुन दुकान आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि व्यवसायीक आस्थापना अनिश्चित काळासाठी सिल करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दि. २७ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार जामखेड शहरातील सर्व दुकानदार, आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि सर्वच व्यवसायिक आस्थापना येथील मालक, कामगार किंवा संबंधित व्यक्ती व त्यांच्याकडे येणारे ग्राहक यांनी संपुर्ण लसीकरण केलेले हवे असे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. मुख्याधिकारी दंडवते यांनी याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जामखेड शहरातील सर्व दुकानदार, आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि सर्वच व्यवसायीक आस्थापना येथील मालक, कामगार किंवा संबंधित व्यक्ती यांनी कोरोना लसीकरण केले किंवा नाही याबाबत जामखेड नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत आॅक्टोबर २०२१ मध्ये सर्वेक्षण केलेले आहे.

संपुर्ण लसीकरण म्हणजे लसीच्या दोन्ही मात्र घेतलेल्या आहेत व दुसरा डोस घेऊन १४ दिवस पुर्ण अशी कोणतीही व्यक्ती. तसेच ज्या व्यक्तीची वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्या मुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरचे प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती, १८ वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती वरील प्रमाणे संबंधित असलेल्यांनी संपुर्ण लसीकरण करण्यास हलगर्जीपणा केल्यास दुकान किंवा आस्थापना, मॉल, मंगल कार्यालये, आदि सर्वच व्यवसायीक आस्थापना अनिश्चित काळासाठी सिल करण्यात येईल असा इशारा जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here