जामखेड प्रतिनिधी

देहविक्रय करणार्‍या महीलांन मध्ये जनजागृती करणे हाच खरा एड्स पासून दूर रहाण्याचा मार्ग आहे. एड्स वर अद्याप औषध नसले तरी योग्य उपचार पध्दतीने रुग्णांचे अविष्य वाढवण्यास मदत होते. असुरक्षित संबधापासुन दुर रहाणे हेच खरे एड्स वर औषध आहे असे मत जामखेड चे न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी व्यक्त केले.

जागतिक एड्स सप्ताहानिमित्त स्नेहालय-स्नेहसक्षम प्रकल्प,१७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. विभाग जामखेड आणि दिशा एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात काढण्यात आलेल्या एच.आय.व्ही./एड्स रॅली’ला संबोधीत करतांना न्यायालयधीश जगताप ते बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे ,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारी, प्राचार्य विकी घायतडक, प्राचार्य अनिवाश फलके, प्राचार्य बी.के.मडके, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, प्राचार्य श्रीकांत होसिंग, श्याम जाधवर, ऍड.पी.के.कात्रजकर,
प्रा.अडसुळ, प्रा.मुकुंद राऊत,
एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.गौतम केळकर, प्रा.मयुर भोसले,प्रा.अनिल देडे,
प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना न्यायाधीश रजनीकांत जगताप म्हणाले की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणाईने एच.आय.व्ही./एड्स यांवर पथदर्शी अधिक काम करून चर्चा घडवून आणून आरोग्य विषयी भारतीय नागरिकांच्या मनामध्ये नवा राष्ट्रनिर्माणाचा दृष्टीकोन निर्माण करण्याचे काम करावे.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत स्नेहालयचे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले म्हणाले की; एच.आय.व्ही./एड्स बाबत तरुणांईमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक आहे.त्यासाठी स्नेहालय व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांच्या माध्यमातून “होऊया सारे एकसंघ,करूया एच.आय.व्ही चा प्रतिबंध” हे ब्रीद घेऊन गेल्या तीन दशकांपासून स्नेहालय यावर जनजागृती करत आहे.महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर एक पथदर्शी काम स्नेहालय’ने उभे केले आहे.एच.आय.व्ही.एड्स’चा प्रसार रोखण्यासाठी अतिजोखिमचे वर्तन असणारे भागांमध्ये जाणीव जागृतीचे काम करते आहे. यावेळी उपस्थितांना एड्स प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रॅली’ला हिरवा झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here