अहमदनगर प्रतिनिधी

शेवगाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे.

भाऊसाहेब घनवट ( अंदाजे वय २५ ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं असून तो तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील रहिवासी होता. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. सदर युवक कपाशीचा व्यापार करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

गळफास घेतलेल्या युवका कडे सुसाईड नोट होती का?, पोलिसांनी ती ताब्यात घेतली किंवा नाही असे प्रश्न यावेळी संतप्त नागरिक पोलिसांना विचारत होते. सुसाईड नोट होती असे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here