जामखेड प्रतिनिधी
खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि २८ नोव्हेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या वक्तृत्व स्पर्धेत जामखेड तसेच ग्रामीण भागातील ३५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा यु.मो. तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांनी केले. स्पर्धेत राजकारण, तरुण, स्त्री सशक्तिकरण, सहकार, शेतकरी आत्महत्या या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे सादरीकरण केले, स्पर्धेतून समाजातील ज्वलंत विषयांवर स्पर्धकांनी आपले मत मांडले. ३५ स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून संतोष भोंडवे, अमोल हजारे, खंडेराव सोळंके व सुसेन चेटमपल्ले यांनी काम केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद,माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे (मामा), सलिम बागवान, वैजीनाथ पाटिल, प्रविण चोरडीया, सोमनाथ राळेभात, माजी नगरसेवक आमित चिंतामणी, शहराध्यक्ष बिभिषन धनवडे, काशिनाथ ओमासे, मनोज कुलकर्णी, ॲड बारगजे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आभिजीत राळेभात, दिनकर टापरे, शिवकुमार डोंगरे, आर्जुन म्हेत्रे, अरूण वराट, गोरख घनवट, योगीराज राऊत, गणेश पोकळे, व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे आभार वैभव कार्ले यांनी मानले.






