जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरासाठी संजीवनी ठरलेल्या १४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठ्यासह शहरातील एकुण २३० कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सह पाच मंत्र्याच्या उपस्थितीत होणार आहे.
जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलणार्या विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते शनिवार दि. १३ नोव्हेंबर रोजी जामखेड शहरात सायंकाळी सहा वाजता होत असून या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक
चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसुल राज्यमत्री अब्दुल सत्तार, नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व राज्यमंत्री दत्तामामा
भरणे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या पर्वाचे साक्षीदार व्हावे असे अवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश
सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केले आहे.
कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्व जग ठप्प झाले असताना रोहितदादांचे कोरोना रुग्णांना सर्व प्रकारचा आधार देण्याबरोबरच मतदार संघाच्या विकासाचं प्लॅनिंग चालूच होतं. मतदार संघाच्या
गरजा काय आहेत ? विकास कामांचा प्राधान्यक्रम कसा असायला हवा ? शासनाच्या विविध विभागाच्या कोणत्या योजना मतदार संघात राबविता येतील ? यासह मतदार संघासह जामखेड
शहराच्या विकासाचा सर्व आराखडा तयार होत होता. आणि त्यातूनच हा सुमारे २२० कोटी रुपयांचा विकास कामाचा शुभारंभ येत्या शनिवारी होत आहे.
जामखेड शहरासाठीच्या उजनी धरणातून येणाऱ्या १४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचं नियोजन करतानाही जामखेड शहरासह नगरपरिषद हद्दीतील सर्व वाड्या व वस्त्यांना या योजनेचा लाभ देण्यातचं नियोजन करण्यात आलं. पुढील तीस वर्षाचा विचार करुन ही योजना तयार करण्यात आलेली असून
जामखेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. या योजनेचं वैशिष्ट्ये असे आहे की विनामोटार तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढणार असून अतिशय स्वच्छ, शुदध व मुबलक
प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.
या पाणी योजनेबरोबरच १५ कोटी रुपयांचे शहरातील रस्ते, ९ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल, ४.३० कोटी रुपयांचे शासकीय विश्रामगृह, ७.८९ कोटी रुपयांचे बस स्थानक व्यापारी संकुल, २ कोटी रुपयांचे नाना नानी पार्क, २ कोटी रुपयांचे अमरधाम, १.५० कोटी रुपयांचे
सार्वजनिक वाचनालय, ८.८२ कोटी रुपयांचे तलाठी कार्यालय, ३.८८ कोटी रुपयांचे पंचायत समिती, ८.८९ कोटी रुपयांचे पोलिस अधिकारी व कर्मचारी वसाहत, १०.९१ कोटी रुपयांचे
पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी निवास्थान, १२.०६ कोटी रुपयांचे महसुल कर्मचारी निवास्थान आदि विकासकामांचे भूमीपूजन संपन्न होत आहे.
जामखेड शहरासाठी एवढा मोठा निधी आणल्याबद्दल मा. आ. श्री. रोहितदादा पवार, व निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार व त्यांच्या सर्व मंत्रमंडळातील सहकार्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी अभार व्यक्त केले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याचे अवहान कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी व तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी केले आहे.






