जामखेड प्रतिनिधी

पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी साकत गणात १५ व्या वित्त आयोगातुन तिनशे बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे साकत गणातील प्रत्येक गावात बाकडे आले आहेत गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले आहे. आता खर्डा गणात बाकडे बसवणार असल्याचे मुरूमकर यांनी सांगितले. मोहा, सावरगाव, शिऊर व नाहुली, देवदैठण नंतर आज धामणगाव येथेही बाकडे बसवलेले आहेत त्यामुळे तेथील लोकांनी समाधान व्यक्त करीत डॉ मुरुमकर यांचा सत्कार केला.

आज प्रा. राम शिंदे साहेबांचे सहकारी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या १५वित्तआयोगातुन जामखेड तालुक्यातील साकत गणातील धामनगाव येथे जनतेला बसण्यासाठी ठीक ठिकाणी बाकडे बसवण्यात आले व लवकरच साकत गणा बरोबर खर्डा जि प गटामधे प्रत्येक गावात बाकडे बसविण्याचा मा डाॅ भगवान दादा मुरुमकर साहेबांचा मानस आहे, धामणगाव ग्रामस्तांनी डाॅ भगवानराव मुरुमकर यांचे आभार मानले त्या प्रसंगी उपस्थित धामणगावचे हॅट्रीक सरपंच महारुद्र महारनवर, उपसरपंच गणेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य दिगांबर महारनवर, नितीन महारनवर, बाबासाहेब महारनवर, प्रभाकर महारनवर, चेअरमन सतिष घुमरे, चेअरमन बबन महारनवर, संजय महारनवर, आबा घुमरे, राहुल महारनवर, शंकर घुमरे, धुळोबा महारनवर, बळीराम थोरात, नारायण गायकवाड, विष्णु भोसले व मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here