जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड ता. अध्यक्ष प्रदीप (भाऊ) टाफरे  यांच्या वाढदिवसानिमित्त नाळवंडी येथील  गहिनीनाथगड वृध्दआश्रम येथे जाउन सामाजिक बांधिलकी जपत आश्रमातील वृद्धांना जिवनावश्यक साहित्य वाटप करून संवाद साधण्याची संधी मिळाल्याने, समाधानाची भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जामखेड  तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे यांनी
 व्यक्त केली.
इतर खर्च वाया न घालता प्रदीप (भाऊ) टापरे यांनी मानुसकीचा धर्म पाळला आहे. असे प्रतिपादन वृद्धाश्रम चे संचालक गहिनीनाथ लोखंडे यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना टापरे म्हणाले,सामाजिक बांधिलकी राखत स्वतःच्या वाढदिवसा निमित्त मित्र परिवाराने  एक वेगळा विचार समाजासमोर मांडण्याचा प्रमाणिक प्रयत्न जोपासला आहे. ज्या वृद्ध बांधवाना स्वतःच्या नातेवाईकांनी दूर सारले व त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अशा वृध्दांकडे येवून सेवा करावी असे मला वाटते. याप्रसंगी मनसे नेते दादासाहेब सरनोबत, भिमटोला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड,
न्यू महाराष्ट्र बेकर्स चे संचालक अमित गंभीर, ता उपाध्यक्ष सनी सदाफुले, संतोष गर्जे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here