जामखेड प्रतिनिधी

तु दिसायला चांगली नाही, तुला स्वयंपाक येत नाही तसेच लाकडी मशिन आणण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणून पिडीत विवाहित महीलेचा छळ केल्या प्रकरणी पतीस एकुण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील वय २४ वर्षीय फिर्यादी महिला रा.दहिवडी ता. शिरूर जि. पुणे हल्ली रा. सदाफुले वस्ती, जामखेड ता. जामखेड यांच्या फिर्यादीवरूनयातील आरोपी पती अमीर कल्लेखान सय्यद, सासू रेश्मा कल्लेखान सय्यद, सासरे कल्लेखान सय्यद, नणंद शाईन मुबारक सय्यद, नणंद आमरीन जमीर मुलानी, नंदावा मुबारक सय्यद, नंदावा जमीर मुलानी सर्व रा. दहीवडी ता.शिरूर जि. पुणे अश्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी ही तीच्या सासरी नांदत असताना यातील आरोपीतानी संगनमत करून फिर्यादीचा सासरी शारीरिक व मानसिक छळ करून घालून पाडून बोलून तू काळी आहेस आम्हाला पसंत नाहीस असे म्हणून आम्हाला आमच्या मुलाचे दुसरे लग्न करायचे आहे, तुला घरात स्वयपाक येत नाही. तुला आमचेकडे सासरी नांदायचे असेल तर आम्हाला लाकडी मशीनरी आणणे करिता वकील व्यवसाय टाकण्यासाठी १० लाख रुपये घेऊन ये असे बोलून फिर्यादीस वेळोवेळी टोचून बोलून शिवीगाळ दमदाटी, मारहाण करून तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून उपाशी ठेवून घराबाहेर हाकलून दिले असे म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पोलीस नाईक एम.ए. कुरेशी हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here