जामखेड-प्रतिनिधी

ल.ना .होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब आप्पा पारखे यांना रविवारी गोपाळशेठ सभागृहात कै. ल. रा देशमुख ऊर्फ तात्यासाहेब देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. आशा ध्येयवादी, उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या गुणांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने कै तात्यासाहेब देशमुख या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार दर वर्षी दिला जातो. चालू वर्षी ल.ना .होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बाळासाहेब आप्पा पारखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषदचे अध्यक्ष मिलिंद जोशी, समाज सेविका सौ. वेणूताई गावस्कर, शिक्षणतज्ञ डॉक्टर अ. ल. देशमुख ,जी. एल. देशमुख, ल. ना होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर उपस्थित होते. बी ए पारखे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बाप्पू देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे सर्व संचालक मंडळाने व विद्यालयातील शिक्षकानीं अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here