कर्जत प्रतिनिधी

एक लाखावर एका दिवसासाठी तब्बल एक हजार रुपये व्याज घेणाऱ्या सावकारावर कर्जत पोलिसांनी कारवाई करीत त्याला चांगलाच इंगा दाखवला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर अवैध खाजगी सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अवैध सावकारकीच्या विरोधात मोहिम उघडली आहे. अवैध सावकारीची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना पोलिसांनी केले आहे. त्यानंतर तालुक्यात अवैध सावकारकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

पोलिसांनी नुकतीच एका लाखासाठी दिवसाला एक हजार रुपये व्याज घेणाऱ्या सावकारावर कारवाई केली आहे. संबंधित अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी ही कारवाई केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here