


लोखंडी राॅड व कोयत्याच्या हल्ल्यात एकजण गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
मागिल भांडणाच्या कारणावरून अंगणात झोपलेल्या एकावर चार जणांनी लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी यांचा मुलगा ओम याचे ऑगस्ट २०२५ मध्ये नान्नज या ठिकाणी साळवे कुटुंबाशी भांडण झाले होते. भांडणामुळे ओम व फिर्यादीचे जावई व इतर नातेवाईक हे सध्या जामखेड कारागृहात आहेत. फीर्यादी चंद्रकांत कल्याण गोरे, वय ५० वर्षे रा. हाळवस्ती, नान्नज हे सोमवारी रात्री साडेदहा वाजता आपल्या घरातील अंगणात झोपले होते. यावेळी त्या ठिकाणी आरोपी यशदीप साळवे, (पुर्ण नाव माहित नाही) सतिष साळवे, (पुर्ण नाव माहित नाही) बाबा शेख, (पुर्ण नाव माहित नाही व सद्दाम पठाण (पुर्ण नाव माहित नाही) चौघे रा. नान्नज हे मध्यरात्री १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आले. व फीर्यादी गोरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपी यशदिप साळवे याने त्याच्या हातातील कोयत्याने फीर्यादी यांच्या कपाळावर वार केला. फीर्यादी हे उठण्याचा प्रयत्न करत असतानाच यातील बाबा शेख, सतिष साळवे व सद्दाम पठाण यांनी लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत फीर्यादी चंद्रकांत गोरे हे गंभीर जखमी झाले. तसेच जाताना म्हणाले की सुनिल भाऊंनी सांगितलेले काम झाले आता हा १५ ते २० मिनीटात मरुन जाईल असे देखील फीर्यादी यांनी ऐकले होते. यानंतर सर्वजण काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओ गाडीने घटनास्थळाहुन पळुन गेले.

यानंतर जखमी फीर्यादी गोरे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी जागे झाले. त्यांना तातडीने जामखेड येथिल हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत फीर्यादी चंद्रकांत गोरे यांनी शुक्रवार दि ८ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील चारही आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.





