Home क्राईम न्यूज महीलेच्या गळ्यातील दिड लाखांची सोन्याची चैन हिसकावली

महीलेच्या गळ्यातील दिड लाखांची सोन्याची चैन हिसकावली

महीलेच्या गळ्यातील दिड लाखांची सोन्याची चैन हिसकावली

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील नागेश विद्यालया समोर मोटारसायकल वरुन आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी महीलेच्या गळ्यातील दिड लाख रुपयांची सोन्याची चैन हिसकावून नेली. जामखेड शहरात रविवारी (१२ एप्रिल २०२६) रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मिलींदनगर, जामखेड येथील फीर्यादी महीला रंजना राम काळे (वय ५५ वर्षे,) या नागेश विद्यालया समोरुन मिलींदनगर येथील त्यांच्या घरी रविवार दि १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.१० वाजता पायी चालल्या होत्या. यावेळी अचानक अज्ञात मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम (प्रति ग्रॅ. ₹३०००, एकूण ₹१,५०,०००) किंमतीची सोन्याची चैन जोरात ओढली आणि चोरटे वेगाने फरार झाले. या घटनेमुळे रंजना यांना धक्का बसला असला तरी सौभाग्याने शारीरिक इजा झाली नाही. त्या घाबरून घरी पोहोचल्या आणि तात्काळ जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोन अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. संजय लोखंडे हे करित आहेत.

या घटनेमुळे मिलींदनगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. विशेषतः महिलांना रात्री एकटे फिरू नये आणि मौल्यवान दागिने कमी करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जामखेड शहरात अलीकडे चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही नेटवर्क वाढवण्याची आणि रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग तीव्र करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकरणाचा तत्काळ तपास करून आरोपींना लवकर अटक करण्याची अपेक्षा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!