राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत ज्ञानेश्वरी धनवेला रौप्यपदक

जामखेड प्रतिनिधी

दिनांक २ एप्रिल ते ४ एप्रिल २०२६ दरम्यान अंबिकानगर

छत्तीसगढ अंबिकानगर येथे दिनांक २ एप्रिल ते ४ एप्रिल २०२६ दरम्यान झालेल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या कु. ज्ञानेश्वरी नितीन धनवे हिने आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करत विविध प्रकारात आपले कौशल्य आजमावत, २ रौप्य तर एक ब्राँझ असे एकूण ३ पदकावर आपले नाव कोरले.

ज्ञानेश्वरीला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे, प्रशिक्षक अमोल निमोणकर, अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच तांत्रिक समितीचे सर्व सदस्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वरीच्या सातत्यपूर्ण कामगिरीने जामखेडसह तिच्या मूळ गाव मातकुळीचे नाव देखील उज्वल होत असून ज्ञानेश्वरीला श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या सर्व सदस्यांनी व श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय मातकुळी, तालुका आष्टी या संस्थेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी, यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वरीच्या व महाराष्ट्र संघाच्या विजयात अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती सदस्य निलेश कुलकर्णी सर यांनी मोलाची भूमिका पार पाडत सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here