जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील अरोळे कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रूग्णांची करत असलेली सेवा याबाबत माहिती जामखेड चे भुमिपुत्र डॉ पांडुरंग नेटके यांना समजली व आपणही आपल्या भागातील रूग्णांना मदत व्हावी या सामाजिक बांधिलकीतुन अॉस्टेलिया येथे री प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करत असलेले डॉ पांडुरंग अर्जुन नेटके यांनी त्यांच्या वडीलांच्या हस्ते 51 हजार रूपयांचा रोख धनादेश अरोळे हाॅस्पिटलचे संचालक रवि अरोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी बोलताना रवि आरोळे म्हणाले या कोवीड सेंटरला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मदत केली यामुळेच आम्ही जवळपास आठ हजार रूग्ण बरे केले. यावेळी बोलताना डॉ पांडुरंग नेटके यांचे वडील अर्जुन नेटके म्हणाले की माझा मुलगा बाहेर देशात रहात असला तरी त्याच्या मनात अपाल्या भागातील अरोळे कोविड सेंटरला मदत करण्याचा विचार आला यातच आपण केलेले संस्कार कामी आले यातच समाधान मानतो. परदेशात रहात आसणारे आपल्या देशातील लोकांनी संकटकाळी आपल्या देश बांधवांना मदत करावी असे आव्हान प्रा. मधुकर आबा राळेभात यांनी केले. यावेळी डॉ रवी अरोळे, अर्जुन नेटके सर, दिगांबर चव्हाण, डॉ. तान्हाजी राळेभात, डॉ. मनिषा राळेभात, सुलताना शेख, सुभाष थोरात, गणेश नेटके, लक्ष्मण ढेपे, अमित जाधव, ऋषिकेश नेटके, गणेश पावसे, असिफ शेख आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here