Home ताज्या बातम्या जामखेड शहरातील कॅफे सेंटरवर पोलिसांचा छापा, कॅफे चालकावर गुन्हा दाखल

जामखेड शहरातील कॅफे सेंटरवर पोलिसांचा छापा, कॅफे चालकावर गुन्हा दाखल

जामखेड शहरातील कॅफे सेंटरवर पोलिसांचा छापा, कॅफे चालकावर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील बीड रोडवरील ‘कॅफे चेसʼ वर कर्जत उपविभागीय पोलीस विभागाच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कॅफेमध्ये पार्टिशन करून अश्लील चाळ्यांसाठी बंदिस्त रूम भाड्याने दिल्याप्रकरणी एका संशयितावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल संदीप श्रीरामे (वय २५, रा. बटेवाडी, जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. सार्वजनिक ठिकाणीअश्लीलता पसरवून इतरांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. यातक्रारींची दखल घेत पोलिसांनी कॅफेचेसवर सोमवार दि ३० मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता छापा टाकला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर यांनी दिलेल्या फियांदीवरून राहुल श्रीरामे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिताकलम २९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार बबन मखरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भैलुमे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वनमाला तोडमल, पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातूरकर यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. डी. कदम हे करत आहेत.


चौकट

शहरात सध्या कॅफे हाऊसच्या नावाखाली अश्लील चाळे आणि अनैतिक कृत्ये सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या गोरखधंद्यामुळे सुजाण नागरिक आणि पालकांमध्ये संतापाची लाट होती. या प्रकारांना कोणाचा छुपा पाठिंबा आहे का ? पोलीसांनी अशा अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होती. या तक्रारी च्या पाश्वभूमीवर वरील कारवाई करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!