जामखेड शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील कान्होपात्रा येथे बकऱ्याचा व्यावसय करणार्‍या आकाश रतन जाधवर या तरुणाने रहात्या घराच्या पहील्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसुन या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मयत आकाश रतन जाधव, वय अंदाजे ३२ वर्षे, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड हा गेल्या आनेक वर्षांपासून बकऱ्याचा व्यावसय करित होता. सोमवार दि ३० रोजी दुपारी आकाश जाधव हा बाहेरुन घरी आला. यावेळी मोटारसायकल दारात लावुन तो घराच्या दुसर्‍या मजल्यावर गेला व छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली. त्याचे नातेवाईक हे सायंकाळी पाच वाजता वरच्या मजल्यावर गेल्यावर सदरची घटना समजली. यानंतर आकाश याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जामखेड ग्रामिण रुग्णालयातील दाखल करण्यात आला. आकाश जाधव याच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. पुढील तपास पोसई शिवाजी कदम हे करित आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here