

जिल्ह्याने आदर्श घ्यावा असे मझहर काझी यांचे कार्य – प्रविण लोखंडे
अझहर काझी यांच्या निवासस्थानी शिरखुर्मा पार्टी संपन्न
जामखेड प्रतिनिधी
इराण- इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे दुबईमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी जामखेडचे सुपुत्र मझर काझी देशप्रेम लक्षात घेत पुढाकार घेऊन मानवतेचा आदर्श निर्माण केला आहे. यांचा आदर्श जिल्ह्याने घ्यावा असे त्यांचे काम आहे असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी व्यक्त केले.
रमजान ईदच्या इदगाह मैदानावरील नमाज पठणानंतर शहरातील अझहर काझी यांच्या घरी अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार यांच्या साठी मानाची शिरखुर्मा पार्टी असते.
यावेळी मौलाना अब्दुल अलीम पठाण, अझरभाई काझी, मजहर काझी, सोहेल काझी, रमिज काझी, आबेद खानसाब, शेख आसिफ, इस्माईल सय्यद, मुज्जू शेख, जुबेर शेख, गुड्डू शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, आकाश बाफना, नगरसेवक अँड. डॉ. अरूण जाधव, प्रा. कैलास माने, मोहन पवार, प्रा. विकी घायतडक, प्रा. लक्ष्मण ढेपे, शिवकुमार डोंगरे, अमोल गिरमे, विकी उगले, सुरेश जाधव, नितीन राळेभात, प्रा. सुनील नरके, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, सुदाम वराट, अशोक वीर, मोहिद्दिन तांबोळी, पप्पू सय्यद, धनराज पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे म्हणाले की, रमजान हा पवित्र महिना आहे आणि याच महिन्यात दुबईत अडकलेल्या भारतीयांना मझहर काझी यांनी मदत केली ही खूप मोठी गोष्ट आहे. जामखेड सारख्या छोट्या शहरातील युवकाने परदेशात राहूनही आपल्या मातीशी असलेले नाते जपले असून, गरजूंसाठी उभे राहण्याची भूमिका घेतली हाच खरा सामाजिक सलोखा आहे.. 
यावेळी बोलताना माजी नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की, स्वातंत्र्य पूर्व काळापासून शहर काझी अझहर भाई यांच्या घरी शिरखुर्मा पार्टी आयोजित करण्यात येते. जामखेड च्या सामाजिक ऐक्यासाठी हिंदू मुस्लिम नेहमीच पुढाकार घेतात. सामाजिक सलोखा राखण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत. यावेळी बोलताना अँड. डॉ. अरूण जाधव म्हणाले की, रमजान ईद हा जगभर महत्त्वाचा सण साजरा होतो. मानवजातीला सुखासमाधानाने जीवन जगता यावे, बंधूभाव राहावा यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत. जगातील प्रत्येक माणसाच्या रक्ताचा रंग लालच आहे, सर्व धर्माच्या धर्म गुरूंनी शांतीचा संदेश दिलेला आहे. यावेळी प्रा. लक्ष्मण ढेपे, प्रा. कैलास माने, मोहिद्दिन तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नासीर पठाण यांनी केले तर आभार अझरभाई काझी यांनी मानले.

चौकट
मझहर काझी यांचा ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने सत्कार
इराण इस्त्रायल- अमेरिका युध्दामुळे दुबईत अडकून पडलेल्या भारतीय प्रवाशांना मानवतेच्या दृष्टीकोनातून पुढे येत सध्या दुबई स्थित मझहर काझी यांनी स्वतः पुढाकार घेवून पन्नास ते साठ भारतीय प्रवाशांना मदत करून मोलाचे सहकार्य करुन
भारतात सुखरूप पोहोचवले आहे. देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी मानून केलेल्या अतुलनीय कार्यामुळे जामखेड ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने मझहर काझी यांचा सत्कार करुन सर्वांनी ईदच्या त्यांना शुभेच्छा दिल्या.








