फक्राबाद येथे पुतण्याने केला चुलत्याचा खुन, तीघांवर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

भावाने मुलगी पळवून नेली त्यामुळे ही गोष्ट मुलीच्या आईला का सांगितली या रागातुन पुतण्याने चुलते तुकाराम सुर्यभान काळे वय ५० रा. फक्राबाद यांचा चाकूने भोसकून खुन केला. ही घटना तालुक्यातील फक्राबाद या ठिकाणी घडली आसुन या प्रकरणी पुतण्यास ताब्यात घेतले आहे. खुनाच्या घटनेने जामखेड तालुक्याती एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी राहुल तुकाराम काळे वय 25 वर्षे धंदा, मजूरी रा.फक्राबाद हा आपल्या कुटुंबा समवेत तसेच मयत वडील तुकाराम सुर्यभान काळे वय 50 वर्षे रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर असे एकत्र राहात आहेत. दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपी सागर एकनाथ काळे व वैभव एकनाथ काळे व तुळसाबाई एकनाथ काळे हे फीर्यादीच्या घरी आले आणि त्यांना सांगितले की, तुम्ही कमल बाळू पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेल्याचे का सांगीतले? असे म्हणत शिवीगाळ केली होती. तसेच तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली होती. त्यानंतर फीर्यादी व आरोपी यांचा वाद मिटला होता.

यानंतर दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजण्याचे सुमारास मयत तुकाराम सुर्यभान काळे रा. फक्राबाद यास आरोपी सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे व तुळसाबाई एकनाथ काळे सर्व. रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी झोपडपट्टी येथे येऊन मयत तुकाराम काळे यास काठीने मारहाण करून चाकुने भोकसले व नंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून मोटारसायकलवर पळुन गेले. यानंतर मयताचा मुलगा फीर्यादी राहुल काळे यास ही घटना समजली तो तातडीने घटनास्थळी आला त्यावेळी फीर्यादीच्या वडीलांचे शरीरावर चाकुने डोक्यात व खांद्यावर वार झाल्याने त्यांना गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच तुकाराम काळे यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आसुन. मयताचा मुलगा राहुल तुकाराम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी वैभव एकनाथ काळे यास जामखेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील घटनेचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here