ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू; PTI ची माहिती

बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक होते, अशी माहिती समोर आली आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या चार प्रचार सभा पार पडणार आहेत. अजित पवार यांचं विमान बारामती एअरपोर्टवर लँडिंग होत होतं त्याचवेळी त्याला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

राजकीय वर्तुळात मोठी पोकळी आणि खळबळ

अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. बारामतीसह राज्यभरातील त्यांचे समर्थक आणि कार्यकत्यामध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक कणखर आणि कार्यतत्पर नेतृत्व हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विविध राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुख्ख व्यक्त केले असून, हे राज्याचे मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

या भीषण विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड किंवा अन्य काही गंभीर त्रुटी यामुळे ही दुर्घटना घडली का, याचा तपास करण्यासाठीनागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पंचनामा करत असून पुढ़ील कार्यवाही सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here