संविधान महोत्सव समितीच्या वतीने सुदाम वराट (सर) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

जामखेड प्रतिनिधी

मराठी साहित्य परिषदेच्या पत्ररत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संविधान महोत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सामनाचे जामखेड प्रतिनिधी सुदाम वराट यांना देण्यात आला आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने २६ जानेवारी २०२६ रोजी“ तेराव्या संविधान महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य मोटारसायकल रँली व यानंतर पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार सुदाम वराट यांना देण्यात आला.

सुदाम वराट हे गेल्या सतरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. सामना वर्तमानपत्रात जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत तसेच पत्रकारितेत काम करताना अनेक सामाजिक, शैक्षणिक प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवत वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. शालेय पोषण आहार योजनेतील निकृष्ट कालबाह्य धान्यादी माला बाबबत आवाज उठवून उच्च प्रतिचा माल संपूर्ण राज्यात सुरू झाला तसेच पिंपळवाडी, कडभनवाडी शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू करण्यात मोलाचा वाटा तसेच रस्ते, पुल, वीज प्रश्न मार्गी लावले. निकृष्ट रस्ता तसेच जलजीवन काम करणाऱ्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करत काही ठेकेदारांवर कारवाई झाली तसेच काहींना काळ्या यादीत टाकण्यात आले. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुदाम वराट यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला यांची दखल घेत संविधान महोत्सव समिती च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे.

यावेळी झी युवा संगीत सम्राट फेम, काळजावर कोरले नांव भीमा कोरेगाव फेम तसेच तुफानातले दिवे आम्ही फेम अजय देहाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर, प्रबोधनात्मक विविध शिव भिम गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करून जुने व नविन गिते सादर केली, या वेळी उपस्थित जनसमुदाय यांनी टाळ्यांच्या कडकडाटांनी साथ दिली. विकी (भाऊ) सदाफुले व समस्त भिमसैनिकांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर सर्वांची जेवणाची सोय करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here