
बनावट सोने देण्याच्या बहाण्याने आलेल्या आंतरराज्यीय टोळीस केले जेरबंद; जामखेड पोलीसांची कामगिरी
जामखेड प्रतिनिधी
नाशिक येथे खोदकाम करताना सोन्याचे मनी सापडले आसुन तुम्ही सर्व मनी आठ लाख रुपयांना विकत घ्या अशी गळ कापड व्यापार्यास आरोपींनी घातली. मात्र प्रसंगावधान राखून व्यापार्याने याची माहिती जामखेड पोलीसांना दिली. यानंतर जामखेड पोलीसांनी खर्डा रोडवर सापाळ रचुन बनावट सोने देण्याच्या बहाण्याने आलेल्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद केले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड शहरातील प्रसिध्द कापड दुकानदार गणेश महादेव खेत्रे रा. जामखेड यांना त्यांच्या कापड दुकाणामध्ये मागिल महीन्यात दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी) वय 24 वर्ष रा.धानसा ता.भिनमाल राज्य राजस्थान याने त्याचे सोबत असलेला आरोपी मोहनलाल बालाजी बागरी वय 56 वर्ष रा. धानसा ता.भिनमाल राज्य राजस्थान यांनी फिर्यादी यांचे क्रिएटीव्ह मेन्स वेअर नावाचे कापड दुकाणात येवून काही कपडे खरेदी केले होते. यानंतर एका पिवळया धातूच्या माळेतील एक मनी फिर्यादी गणेश खेत्रे यांना देवून सांगितले की, नाशिक या ठिकाणी खोदकाम करताना सोन्याचे मनी आम्हाला मिळून आले आहेत. तुम्ही सोनाराकडे जावून हे सोने आहे का याची खात्री करा व आम्हाला पैशाची गरज असल्याने आठ लाख रूपयामध्ये आमच्या कड़ील सर्व माल विकत घ्या, आरोपी वेळोवेळी त्यांच्या कडील बनावट सोने फिर्यादी यांना विकण्यासाठी फिर्यादीचे मोबाईलवर आरोपी कडील मोबाईल वरून संपर्क करत होते. यानंतर गुन्हयातील आरोपीनी दिनांक 15 डीसेंबर रोजी रोजी दुपारी पावनेतीन वाजता जामखेड कडून खर्ड्याकडे जाणार्या रोडवरील रंगोली हॉटेलच्या जवळ थांबून फिर्यादीस ठरलेली रक्कम घेवून बोलावले होते.

सदर बनावट सोन्याची जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत विक्री करून फसवणूक होणार असल्याची माहीती गुप्त बातमीदारा मार्फत जामखेड पोलीसांना मिळाली होती. मिळालेल्या बातमी नुसार गुन्हा घडण्यापुर्वाच पोलीस निरीक्षाक यांचे आदेशान्वये जामखेड पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक खर्डारोड परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी हॉटेल रंगोली या ठिकारणी फिर्यादी, त्यांचा भाऊ व मित्र असे चारचाकी वाहनातून गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस त्यांचे कडील बनावट सोने देवून, पैशाची मागणी केली त्याचवेळी फीर्यादी यांनी हे सोने नसून बनावट सोन्याचे दागिणे आहेत असे म्हणताच 1) अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी) वय 24 वर्ष रा. धानसा ता. भिनमाल राज्य राजस्थान 2) प्रविणकुमार मोहनलाल बागरी वय 25 वर्षे रा.भिनमाल राज्य राजस्थान यांनी फिर्यादीस मारहान करून त्यांचे खिशातील रोख रक्कम तीन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले.

त्याठिकाणी गोंधळ व आरडाओरड झाल्याचे लक्षात येताच खर्डा रोडवर सापळा रचून पेट्रोलिंग करत असलेले जामखेड पोलीस स्टेशन येथील पो. ना वाघ, पो.कॉ देवा पळसे, पो. कॉ. घोळवे व पो. कॉ शेवाळे अशांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेवून त्यांचेकडे घटनेच्या अनुशंगाने अधिकची विचारपूस केली असता. आरोपी यांनी सांगितले की, त्यांचे सोबत असलेला एक आरोपी हा खर्डा बसस्थानक याठिकाणी थांबला आहे. असे सांगितले तात्काळ जामखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने खर्डा या ठिकाणी थांबलेला आरोपी क्रमांक तीन मोहनलाल बालाजी बागरी वय 56 वर्ष रा.धानसा ता.भिनमाल राज्य राजस्थान यास ताब्यात घेवून वरील आरोपी विरूध्द जामखेड पोलीस स्टेशनला फेर्यादी नामे गणेश महादेव खेत्रे वय 32 वर्ष धंदा कापड दुकान रा. महादेव गल्ली, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयातील आरोपींच्या अंगझडतीत फिर्यादीचे काढून घेतलेले रोख रक्कम तीन हजार रुपये पंचनामा करून हस्तगत करण्यात आले. तसेच आरोपींनी गुन्हयात वापरलेले पिवळ्या धातूच्या बनावट सोन्याच्या माळा अंदाजे वजन 1 किलो ग्रॅम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून पुढ़ील तपास सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.









