जामखेड प्रतिनिधी
कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी सामना करण्यासाठी शासन, व्यक्ती आणि समाज या सर्वांनी सामूहिक प्रयत्न करत लढा देणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील CYDA या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक मँथुव मँट्टम व संचालिका व जामखेड ची कन्या प्रियंका राजेंद्र कोठारी यांच्या पुढाकाराने पुण्यातील येरवडा येथे गोल्फ क्लब परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी खास सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या कोवीड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते व शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती मा.ना.निलमताई गोरे , उपमहापौर मा.सुनीता वाडेकर व नगरसेवक मल्हारी साळवे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. या सामाजिक बांधिलकीतून CYDA ने सुरु केलेला कोवीड सेंटरच्या उपक्रमाचे कैतुक देखील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले आहे.
सदर कोवीड सेंटर 220 बेडचे असून यात विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष रचना केलेली आहे. या कोवीड केअर सेंटरच्या उभारणी मध्ये सीवायडीए, पीएमसी पुणे , गीव्ह इंडिया ओकवेन, सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया ,क्विक हील, ऑक्सफॅम आणि सौ. शिला साळवे मेमोरियल ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले.
संस्थेच्या संचालिका प्रियंका कोठारी या जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारींच्या कन्या आहेत. कोठारींचा समाज सेवेचा वारसा प्रियंकांनी ही सुरूच ठेवला असून कोरोनाच्या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लढ्यात CYDA ने वैद्यकीय मदत,धान्य, किराणा वाटपासह अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत.






