जामखेड प्रतिनिधी 

अडचणीच्या काळात शिक्षकांकडून समाजाला नेहमीच मदत होत असते. कोरोना संसर्गाच्या काळातही जामखेड तालुक्यातील रयतचे प्राचार्य-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी १ लाख ५१ हजार ईतका कोव्हीड मदत निधी जमा केला आहे. याचा उपयोग गोर- गरीब जनतेसाठीच होणार आहे. असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या पुण्यतिथी निमित्त मदत निधी संकल्प करून एक लाख एकावन्न हजार रुपये मदत जमा करून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आ. रोहित पवार यांच्या हस्ते डॉ. रविदादा आरोळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या वेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे,पो. नि. संभाजी गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ, कोवीड सेंटरच्या सुलताना शेख, गट विकास अधिकारी परसराम कोकणी, जामखेड रयत गट प्रमुख प्राचार्य भगवान मडके, प्राचार्य सोमनाथ उगले, मुख्याध्यापिका चौधरी के. डी. , प्राचार्य रमेश वराट, प्राचार्य गरड ए. एस., मुख्याध्यापक कल्याण वायकर, नरसेवक महेश निमोणकर,उद्योजक रमेश आजबे, प्रा.रमेश बोलभट, एनसीसी प्रमुख मयुर भोसले, दिलीप ढवळे, हनुमंत नागरे, सतीश टेकाळे, बी. एस. शिंदे, तुकाराम लोहार, बापूराव विधाते , प्रा. घुमारे, अमित गंभीर व रयत सेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here