
उल्लेखनीय सामाजिक कामामुळे पै सुरज रसाळ यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढवावी, गटातील कार्यकर्त्यांची मागणी
जामखेड प्रतिनिधी
दिघोळ सह परिसरात कै. आबासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम सुरू आहे. यामुळे महायुतीच्या माध्यमातून सुरज रसाळ यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढवावी अशी परिसरातील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कामाला अधिक बळकटी मिळेल अशी भावना कार्यकर्त्यांची आहे.
महायुतीच्या माध्यमातून विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात कै. आबासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम सुरू आहे. हे काम अधिक प्रभावी पणे करण्यासाठी महायुतीकडून पै
सुरज रसाळ यांनी जिल्हा परिषद निवडणुक लढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पै. सुरज रसाळ यांचा राजकीय सामाजिक कामांचा धडाका आपला व्यावसाय सांभाळत असतांना राजकीय व सामाजिक काम देखील जोमाने सुरु आहे. वडिलांच्या नावाने आबासाहेब सामाजिक
प्रतिष्ठांनची स्थापना करून शिवजयंती निमित्त वत्कृत्व स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट किटचे वाटप, नवरात्र उत्सवानिमित्त राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्याकुटुंबातील मुलीचे स्वागत म्हणून सुकन्या योजना सुरु करुन मुलींच्या नांवे खात्यावर ५०००/- जमा करुन एफडी करण्यात येत आहे. शालेय स्पर्धेसाठी लागणारे स्पोर्ट किट दरवर्षी खेळाडूंना दिले जाणार आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

वडीलांनी प्रभावी पणे सांभाळलेले दिघोळ माळेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्षपद पै धीरज रामभाऊ रसाळ यांच्याकडे तर सुरज रामभाऊ रसाळ यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका युवक अध्यक्षपदी पदाची जबाबदारी आहे. दिघोळ गावाने वडिलांनंतर कामाचा पावती म्हणून त्यांचे कडे असलेले तंटामुक्ती अध्यक्ष पद पै. धिरज रामभाऊ रसाळ यांच्याकडे दिले आहे. तसेच सुरज रामभाऊ रसाळ यांनी राजकीय जीवनात काम करत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तालुका युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री प्रा. राम शिंदे साहेब यांना मताधिक्यासाठी दोन्ही बंधूंनी जोमाने काम केले होते.
वारसा जनसेवेचा सामाजिक कामाचा
वारसा जनसेवेचा आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून कै.पै.रामभाऊ बाबुराव रसाळ आबा २०२४ / २०२५ साठी स्त्री जन्माचे स्वागत करूया या संकल्पनेतून जामखेड तालुक्यातील दिघोळ आणि माळीवाडी गावातील कोणत्याही कुटुंबात मुलगी जन्माला आली की त्या मुलीच्या नावे आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत पाच हजार रुपयांचा चेक दिला
जातो. त्याच कार्यक्रमाचा धनादेश वाटप कार्यक्रम मागील काही दिवसांत तहसीलदार गणेश माळी यांच्या उपस्थितीत झाला.

आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत रसाळ कुटुंब पै धीरज व सुरज रसाळ हे सतत सामाजिक उपक्रम करतात. त्याच उपक्रमापैकी हा एक स्तुत्य उपक्रम त्या उपक्रमाचा धनादेश वाटप आले आहे. आबासाहेब प्रतिष्ठान मार्फत जेवढे काही सामाजिक करता येईल तेवढे करणार असं दोन्ही रसाळ बंधूंनी घोषित केलं आजपर्यंत केलेल्या कार्यक्रमापैकी सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे सार्वजनिक नवरात्र उत्सवा निमित्त महाराष्ट्रातील राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम नऊ दिवस केले प्रत्येक शिवजयंतीला वकृत्व स्पर्धा, १५ ऑगस्ट पण प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात.
पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप केले.
आबासाहेब प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम करत आहे आणि करत राहणार अशी ग्वाही रसाळ बंधूंनी दिली. उल्लेखनीय सर्व सामाजिक कामामुळे पै सुरज रसाळ यांनी जिल्हा परिषद निवडणुक महायुतीच्या माध्यमातून लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.
1) ©चौकट©
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा ना अजित दादा पवार व विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे साहेब यांच्यासोबत असलेल्या विश्वासातून युवा कार्यकर्ते पै सुरज रसाळ आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास करतील अशी भावना संपूर्ण युवक कार्यकर्त्यांमध्ये आहे
2) ©चौकट©
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट झाल्यास साकत गटातून जिल्हा परिषद निवडणुक आणि जर दोनच गट राहिले तर साकत गनातून पंचायत समिती निवडणुक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.






