बरेच लोक म्हणाले कर्जत जामखेडसाठी एमआयडीसी आणणार पण आली का? अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

जामखेड प्रतिनिधी

कंत्राटदार बदलले आहेत, एसटीचे प्रश्न सुटले नाहीत, रोहीत माझ्या सोबत असताना मी किती कोटींचा निधी दिला याची माहिती घ्या, आता रोहीत माझ्या सोबत नाही. प्रा. राम शिंदे यांना भाजपने सभापती केले. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी आणावी लागणार आहे. बर्‍याच जणांनी सांगितले एमआयडीसी येणार आहे, पण एमआयडीसी आली का? असा सवाल करत अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला. आता एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

जामखेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या हस्ते गुरुवार दि 17 रोजी सायंकाळी संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय युवक अध्यक्ष धिरज शर्मा, राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, प्रा. सचिन सर गायवळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, राजेंद्र गुंड, ॲड. बाळासाहेब मोरे, प्रदेश युवती अध्यक्षा संध्या सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, उपाध्यक्ष बापुराव शिंदे, संतोष मोहळकर, विकास राऊत, मनोज वराट, अतुल जगताप, अक्षय म्हेत्रे, राम निमोणकर, सोमनाथ राऊत, बबलु निमोणकर, भागवत म्हेत्रे, निलेश बिराजदार, दादा (मेजर) निमोणकर, अजय गौड, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, बेलवंडी सरपंच ऋषीकेश शेलार व श्रीगोंदा येथील असंख्य कार्यकर्ते तसेच जामखेड येथील माजी नगरसेवक राजेश वाव्हळ, शामीरभाई सय्यद, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गणेश काळे, अजित रेडे, कृष्णा गाडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की मी जिल्ह्यातील कारखान्यांची नावं घेणार नाही. नाहीतर काही लोक फोन करुन मला म्हणतील जामखेडच्या भाषणात आमच्या कारखान्याचं कशाला काढलं? पण जनतेने कारखाना, जिल्हा बँक, सोसायट्यान कडे लक्ष ठेवले पाहिजे. अनेक संस्थांची वाईट परिस्थिती झाली आहे. बारामतीचा विकास काही उगीच झालेला नाही. कामं करावी लागतात असे अजित पवार म्हणाले. जामखेड शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रखडलेल्या रस्त्यासाठी मी वेळप्रसंगी नितीन गडकरी साहेबांशी बोलेल असे अजित पवार म्हणाले. मी पुण्यातील रस्त्यांची कामं करण्यासाठी वेळ प्रसंगी लोकांशी वाईटपणा घेतला. काही जणांची घर काढावी लागली. पण पाच टक्के लोक नाराज झाले तरी पंच्चानो टक्के लोक खुश व समाधानी होतात असे देखील अजित पवार म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे उभारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. अर्थ खातं आपल्याकडे असल्यानं या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही याबाबत सभापती प्रा राम शिंदे यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. असे अजित पवार म्हणाले. आपल्याला कोणतही काम अत्यंत चोख केलेलं लागत असेही ते म्हणाले. वाद घालून कुणाचं भल झालेलं नाही. जो माणूस योग्य दिशेने कामं करतो त्याच्या मागे उभं राहा असे अजित पवार म्हणाले. मी कधीही कुणावर टीका करत नाही. जनतेने त्यांचं काम केलं आहे, लाडक्या बहिणीने आमचं काम केलं आहे असे अजित पवार म्हणाले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर म्हणाले की, अजित दादा शब्दाला जागणारे नेते आहेत. आज जामखेड पवित्र झाले आहे. मतदार संघासाठी कुकडीचे पाणी, एमआयडीसी, पाणीपुरवठा योजना याबाबत लक्ष घालावे व कर्जत जामखेड साठी आशिर्वाद हवा आहे. अर्थखाते तुमच्याकडे आहे आम्ही काम घेऊन तेव्हा तुम्ही आमचे प्रश्न सोडवा असे देखील महेश निमोणकर आपल्या भाषणात म्हणाले.

उमेश पाटील यांचा आ. रोहित पवार यांना टोला

विद्यमान आमदाराने अजितदादांचे बॅनर लावले असल्याचे समजले आहे. त्यांनी आमच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला नाही. विरोधामध्ये राहून काम होत नाही, निर्णय होत नाही. सेल्फी काढून रस्ता होत नाही. हजार मताने निवडूण आलेले आता काय करणार तसेच सत्तेचे महत्त्वाचे पद विधान परिषदेचे सभापती पद प्रा. राम शिंदे यांच्याकडे आले आहे. राज्यपाल नंतर ते महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्यांच्या हिशोबाने कामे होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here