जामखेड प्रतिनिधी
तु माझ्या सोबत आली नाही तर मी आत्महत्या करेल असे धमकावून साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन अगरचंद खाडे व बाबा दयाराम खाडे दोन्ही रा. बाळगव्हाण ता.जामखेड. अशी आरोपींची नावे आहेत. पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फीर्यादीत म्हंटले आहे की आरोपी क्रमांक १ व २ यांनी संगनमत करून आरोपी नंबर १ हा म्हणाला की तू माझ्या सोबत चल ,आली नाहीस तर तुला उचलून नेईल, तुझ्या बापाच्या घरात औषध पिऊन आत्महत्या करील ,असे म्हणून आरोपी क्रमांक १ व २ यांनी यातील फिर्यादीचे तोंड दाबून बळजबरीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. या नंतर आनंदवाडी शिवारातील उसाच्या शेतात घेऊन जाऊन फिर्यादीच्या ओढणीने तिचे हात पाय व रुमालाने तोंड बांधून दमदाटी करून आरोपी क्रमांक १ याने मारहाण करुन दोन दिवसात दोन वेळा अत्याचार केला अशी फीर्याद पिडीत मुलीने दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.






