रोखठोक कर्जत…..

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील निंबोडी या गावांमध्ये चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात मध्ये खंडू गरड वय पन्नास वर्ष व भरत बर्डे वय 35 वर्षे हे दोघेजण जखमी झाले आहेत
याबाबत घडलेली घटना अशी की तालुक्यातील निंबोडी या गावामध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरटे आले होते त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांची इतर नातेवाईकही जागे झाले त्यावेळी चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली परंतु सहा जणांनी त्यांचा पाठलाग केला
चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गावठी कट्टा मधून गोळीबार करून रघुनाथ गरड व भरत बर्डे यांना जखमी केले आहे या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटना स्थळी पोलीस अधिकारी आले असून दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत अशी माहिती दादासाहेब गरड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here