रोखठोक अहमदनगर….

दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून चिंता व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1996 कोरोना बाधित आढळून आले.

ही आकडेवारी यावर्षीचा उच्चांक असून वाढता कोरोना बाधितांचा आकडा जिल्ह्याला लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंधाकडे घेऊन जात आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 476, कोपरगाव 202, राहाता 195, श्रीरामपूर 193, संगमनेर 154, पाथर्डी 140, जामखेड 94, नगर ग्रामीण 93, राहुरी 79, शेवगाव 69, श्रीगोंदा 69, पारनेर 65, नेवासा 57, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 31, अकोले 28, कर्जत 25, इतर जिल्हा 19 असे एकूण रुग्ण आढळले आहेत.

आज शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 823, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 902 आणि अँटीजेन चाचणीत 271 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 212, कोपरगाव 35, राहाता 53, श्रीरामपूर 54, संगमनेर 97, पाथर्डी 84, जामखेड 75, नगर ग्रामीण 26, राहुरी 06, शेवगाव 39, श्रीगोंदा 26, पारनेर 49, नेवासा 10, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 30, अकोले 03, कर्जत 16, इतर जिल्हा 03, मिलट्री हॉस्पीटल 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 228, कोपरगाव 148, राहाता 134, श्रीरामपूर 111, संगमनेर 57, पाथर्डी 28, जामखेड 12, नगर ग्रामीण 58, राहुरी 38, शेवगाव 14, श्रीगोंदा 19, पारनेर 05, नेवासा 19, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड 01, अकोले 04, कर्जत 08, इतर जिल्हा 16, इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 271 जण बाधित आढळुन आले. मनपा 36, कोपरगाव 19, राहाता 08, श्रीरामपूर 28, पाथर्डी 28, जामखेड 07, नगर ग्रामीण 09, राहुरी 35, शेवगाव 16, श्रीगोंदा 24, पारनेर 11, नेवासा 28, अकोले 21, कर्जत 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here