रोखठोक जामखेड…… 

फळे पिकवण्यासाठी लागणारा एसी आणण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील पती व सासु – सासर्‍यासह एकुण आठ जणांनवर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीर्यादी विवाहित महिला ही लग्न झाल्यानंतर आपल्या नगर येथील माळवाडा येथील पंचपीर चावडी भागात सासरी नांदत होती. तर तीचे माहेर जामखेड येथील कुंभारतळ या ठिकाणी आहे.

सासरकडील पती जावेद मोहम्मद हुसेन बागवान, सासु रशिदा महंमद हुसेन, सासरे महंमद हुसेन हसंन बागवान, नंणद नाजिया पिरमहमद , भाया साजिद महमद हुसेन बागवान, जाव रुकैय्या साजिद बागवान व दिर -समीर महंमद हुसेन बागवान, सर्व रा. माळीवाडा पंचपीर चावडी ता. जिल्हा अहमदनगर. या आठ जणांनी वरील फिर्यादी महीलेस तीच्या माहेरुन घर बांधणी करता दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच फळ पिकविण्याचा नवीन एसी खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपये आणावे असे म्हणून तसेच तू येथे राहायचे नाही व हे घर सोडून दे असे म्हणून फिर्यादी महीलेस दम देऊन हाता बुक्क्यांनी व प्लॅस्टिकच्या खुर्ची ने डोक्यात मारहाण केली व माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये नाही तर येथे राहू नको हे घर सोडून दे तसेच तुझ्या नावावर असलेली जागा आमच्या नावावर कर असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली तसेच सासरकडील लोकांनी फिर्यादीस शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करून व पैशाची मागणी करून घराबाहेर हाकलून दिले. अशी फीर्याद पिडीत महीलेने जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. यावरून सासरकडील पती व सासु सासर्‍यांसह एकुण आठ जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो हे कॉ शिवाजी भोस हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here