रोखठोक न्यूज…..
मार्च २०, २०२१
शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर जामखेड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन केले. मात्र कोव्हिड काळात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन मधील तीन महिन्याची थकीत लाईट बिल व केंद्र सरकारच्या जाचक शेतकरी विरोधी कायदे या निर्णया विरोधात जामखेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल दि 20 रोजी जामखेड तालुका अध्यक्ष श्री मंगेश दादा आजबे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. मात्र कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी काढलेल्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनचे तालुकाध्यक्ष मंगेश पांडुरंग आजबेंसह सुनिल पांडुरंग लोंढे, हनुमान उगले, राहुल पवार, ऋषिकेश डूचे, नामदेव कुमटकर सह इतर वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जामखेड शहरातील व्यापारी, नोकरदार वर्ग, शेतकरी, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी इत्यादींचे नेहमीचे येण्याजाण्याचे मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बसून रस्ता अडवला व त्यांची वाहने, त्यांचे दैनिक काम व्यवसाय-व्यापार करण्यास प्रतिबंध करून त्यांची गैरसोय केली आहे. यामुळे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काॅन्स्टेबल अविनाश ढेरे यांच्या फिर्यादीवरून साथ रोग प्रतिबंधक कायदा नुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






