रोखठोक अहमदनगर……
माजी केंद्रीय मंत्री,ज्येष्ठ भाजप नेते दिलीप गांधी (वय६९) यांचे आज पहाटे करोनामुळे निधन, दिल्लीत सुरू होते उपचार.
दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दिलीप गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता कोरोनाचे निदान झाले.






