Home क्राईम न्यूज वाघा येथे घरफोडी, ३ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

वाघा येथे घरफोडी, ३ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

वाघा येथे घरफोडी, ३ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील वाघा येथे दि २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ९६ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील वाघा याठिकाणी फीर्यादी आकाश रामदास बारस्कर वय २६ वर्षे हे आपल्या आई वडीलांसह घरातील एका हॉलमध्ये झोपले होते. यावेळी दि. २५ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला व फीर्यादी झोपलेल्या हॉलची बाहेरुन कडी लावुन घेतली होती. यानंतर या चोरट्यांनी फीर्यादीच्या कीचनच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडुन आत प्रवेश केला. तसेच कीचन मधिल कपाटाची उचका पाचक करुन कपाटात ठेवलेले सोन्याचे मणीगंठन, सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, कर्णफुले, नथ, बोरमाळ, गंठण, बदाम पेटी, कानातील वेल सोन्याची नथ, सुट्टे मनी, कानातील झुबे व चांदीचे काही दागीने असा एकुण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला व चोरटे पसार झाले.

पहाटे फीर्यादीचे वडील हे लघुशंकेला उठले असता हॉलची चोरट्यांनी बाहेरुन कडी लावलेली लक्षात आले. यानंतर किचन मध्ये ठेवलेल्या सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले असल्याचे लक्षात आले. या चोरी प्रकरणी फीर्यादी आकाश रामदास बारस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. तसेच कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे हे करित आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!